पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत दयावी.
----------------------------------
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
----------------------------------
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने प्रांताधिकारी व तहसिलदार यांचेकडे केली मागणी
जावलीतील खरीप हंगाम अडचणीत.
जावली तालुक्यातील खरीप हंगाम अडचणीत आला असू पिकांच्या नुकसानीचे पचनामे करून त्वरीत आर्थिक मदत दयावी . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तेलंगना राज्याप्रमाणे सरसकट कर्ज माफी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार या पक्षाचे वतीने प्रांताधिकारी सुधाकर भोसले , तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ईपिक नोंदणी कार्यक्रमासाठी करंजे ता. जावली येथे प्रांताधिकारी , तहसिलदार व त्यांची शासकिय टीम गेली असता शेतीच्या बांधवरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांचे वतीने निवेदन देण्यात आले . यावेळी नायब तहसिलदार संजय बैलकर , सर्कल एस् .व्ही. मुळीक, तलाठी शंकर सावंत उपस्थीत होते.
निवेदनात दिलेल्या माहिती नुसार गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे तर चालु वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जावली तालुक्यातील खरीप हंगाम अडचणीत आलेला आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी. त्याच बरोबर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी .
जावली तालुक्यामध्ये सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खाजगी मालमत्ते बरोबरच सार्वजनिक मालमत्ता व शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे .. तालुक्यातील खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २०६४३ हेक्टर असून त्यापैकी सर्वाधिक क्षेत्रावर भात पिक घेतले जाते .तर भुईमुंग , सोयाबीन , घेवडा व अन्य कडधान्याची पिके ही मोठया प्रमाणावर घेतली जातात . सध्या तालुक्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे कडधान्यांची पिके शेतामध्येच कुजुन गेली आहेत. तर उशीरा लागण झालेली भातशेती ही अडचणीत आली आहे. जावली तालुक्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी. तेलंगणा राज्याप्रमाणे सरसकट कर्ज माफी करावी. अशी मागणी "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार " या पक्षाच्या वतीने शासनाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे सातारा - जावली विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे , प्रसिद्धी प्रमुख नारायण शिंगटे, बाजार समितीचे संचालक सुंदर भालेराव , किसन जवळ , संजय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे संदीप पवार, मधुकर शेलार, युवक अध्यक्ष इम्रान आतार, मोहन देशमुख , रामदास इंगुळकर इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.
फोटो
प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसिलदार हणमंत कोळेकर यांना निवेदन देताना सुरेश पार्टे , नारायण शिंगटे
0 Comments