Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्थेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन.

 स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्थेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन.

---------------------------------- 

रिसोड तालुका प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर 

---------------------------------- 

स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम तर्फे मोप येथील ज्ञानदृष्टी कोचिंग क्लासेस मध्ये आज दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.


सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून

संस्थेचे कोषाध्यक्ष श्री हरिदास बाजड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री अशोकराव नरवाडे (मा . सरपंच मोप), श्री संतोष घायाळ (पोलीस पाटील मोप) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुरलीधर मस्के (दुग्ध उत्पादक शेतकरी असोला), श्री सतीश नरवाडे, श्री हनुमान नरवाडे, श्री केशव पारवे व श्री गजानन कामटे हे उपस्थित होते. 

श्री अशोक नरवाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा ,कादंबऱ्या व पोवाड्यातून समाजामध्ये सुरू असणाऱ्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यावर लिखाण केले व समाजामध्ये जागृती घडवून आणली सामाजिक अन्यायविरोधात अण्णाभाऊंची लेखणी ही पूर्णपणे तळपत होती असे सांगितले तर श्री संतोष घायल यांनी लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच या गर्जनेद्वारे भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरिदास बाजड यांनी संस्था विविध समाज सुधारक व स्वातंत्र्य सेनानी च्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करून त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करते आहे. अण्णाभाऊंनी केलेले समाज जागृतीचे कार्य व लोकमान्य टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे केलेले कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुरलीधर मस्के, श्री सतीश नरवाडे, श्री हनुमान नरवाडे यांचीही यथोचित भाषणे झाली. सदर कार्यक्रमाला  प्रतीक नरवाडे कार्तिक थोरात, शौर्य बाजड  व आदित्य क्षीरसागर हे विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वरी नरवाडे हिने केले तर आभार वेदिका काकडे हिने मानले.

Post a Comment

0 Comments