मुलानेच मारला बापाच्या दागिने, पैशावर डल्ला घरफोडीच्या गुन्ह्याची बारा तासांत उकल.

 मुलानेच मारला बापाच्या दागिने, पैशावर डल्ला घरफोडीच्या गुन्ह्याची बारा तासांत उकल.

-------------------------------

मेढा प्रतिनिधी 

शेखर जाधव

-------------------------------

 सपोनि पृथ्वीराज ताटे आणि टीमची दमदार कारवाई 

 मेढा:-- जावली तालुक्यातील कुडाळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा सखाराम शेवते यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख पैशासह तीन लाख तीस हजारांचा डल्ला मारला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि पृथ्वीराज ताटे आणि त्यांच्या टीमने कसून तपास करत या घरफोडीचा छडा फक्त बारा तासांत लावला. शेवते यांचा मुलगा नीलेश यानेच ही घरफोडी केल्याची उकल करून दिवट्या मुलाला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सपोनि ताटे यांनी मेढा पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झाल्यानंतर आपल्या कारभाराची चुणूक दाखवून दिली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या


सपोनि पृथ्वीराज ताटे आणि टीमची दमदार कारवाई


घरफोडीतील आरोपी नीलेश पृथ्वीराज साठे, विजय शिंगटे, माहितीनुसार कुडाळ येथील कृष्णा शेवते यांच्या राहते बंद घराचे दरवाज्याचे कुलूप काढून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घराचे भिंतीतील लाकडी कपाताचा कडी कोयंडा काढून कपाटातील पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम असे एकूण ८०,००० रुपये रोख रक्कम असा ३,३०,००० रू. किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून


शेवतेसह सहायक पोलीस निरीक्षक विकास गंगावणे व पोलीस टीम. चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार शेवते यांनी पोलिसात दाखल केली होती. गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करत असताना ही घरफोडी शेवते यांचा घरातून विभक्त राहणारा मुलगा निलेश कृष्णात शेवते याने केला असल्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने

गुन्हा तात्काळ उघडकीस आला.


आरोपी निलेश याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच रोख रक्कम ५५,५०० रूपये असा एकुन ३,३०,००० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या कारवाईत सपोनि पृथ्वीराज ताटे, सहा. पोलीस फौजदार विकास गंगावणे, विजय शिंगटे, पो.हवा.डी. जी.शिंदे, पी.डी.माने, पो.कॉ.आर. टी. शेख, सनी काळे, अभिजित वाघमळे यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.