वाशिम बस स्थानक येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन.

 वाशिम बस स्थानक येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन.

---------------------------------- 

 रिसोड प्रतिनिधी 

रणजीत सिंह  ठाकुर 

---------------------------------- 

वाशिम ; साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त वाशिम बस स्थानक येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित  बस आगार प्रमुख गोविंद उजवने ,बस स्थानक प्रमुख श्री. तेलगोटे ,वरिष्ठ विभागीय कार्यालय अकोल्याचे श्री.साखरकर,कार्यशाळा प्रमुख श्री.थोरवे,संतोष भालेराव,जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदिप पट्टेबहादुर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला दीपक प्रज्वला व गुलाब तुळशी दहा किलोची पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

१ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. असे मार्गदर्शन प्रदिप पट्टेबहादुर  यांनी केले, 


यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रवाशांना (फ्रुट)फळे वाटप करण्यात आली.

यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक संतोष भालेराव, राहूल शिंदे,संतोष खूनारे,आकाश खुनारे,अंकुश सोनवणे सुनील कर्डिले,राजेश खूनारे,राहुल खूनारे,अजय गावंडे,सुभाष खूनारे, गोविंद तायडे,सुमित घुले,प्रमोद बनसोड ,दीपक लाटे

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.