Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार.

 बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार.

-------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

-------------------------------

मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकावर कारवाई करणार  -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.


मुंबई दि 20 बदलापूर मध्ये एका शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकावर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. 

आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी 

 जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भ मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळेमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

बदलापूर पूर्वेतील एक नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नये म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यासा सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्यांच्या ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. 

विद्यार्थ्यांनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निर्देशनास म्हणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असे मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्व शाळेमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. 

जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल यावेळी मुख्यमंत्री रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments