महापूरामुळे होड्यांच्या शर्यती स्थगित.
महापूरामुळे होड्यांच्या शर्यती स्थगित.
---------------------------------
हातकणंगले/प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त घेण्यात येणार्या होड्यांच्या शर्यती यंदा पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली.
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. यंदाही शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पंचगंगा नदीला आलेल्या महापूराचे पाणी अद्यापही ओसरलेले नाही. पंचगंगा नदीची पाणी पातळी अद्यापही 67 फुटाच्यावर आहे. त्यामुळे यंदा होणार्या शर्यती स्थगित करण्यात आल्या आहेत. होड्यांच्या शर्यतीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे अध्यक्ष कलागते यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment