कुंभोज येथे ग्रामपंचायत व विविध शासकीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथे 78 व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी ग्रामपंचायत कुंभोज येथील ध्वजारोहण ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्मिता चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे दीपक चौकीतील ध्वजारोहण उपसरपंच अशोक आरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुंभोज कन्या शाळा, गर्ल हायस्कूल ,न्यू इंग्लिश स्कूल ,प्राथमिक विद्यामंदिर कुंभोज, आश्रम शाळा, ओम पब्लिक स्कूल ,बाहुबली विद्यापीठ बाहुबली, प्रजापिता ब्रह्माकुमारी अधत्मिक केंद्र कुंभोज, विक्रम सिंह सेवा सोसायटी , सुर्योदय तरुण मंडळ,तसेच गावातील विविध तरुण मंडळ,पतसंस्था ,बँका यांच्या दारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर ध्वजारोहणास हायस्कूल शाळा, मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, कोल्हापूर जिल्हा बँक शाखा मॅनेजर सुनीता वाईकर ,कर्मवीर भाऊराव पाटील जयसिंगपूर पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे, तसेच ग्रामविकास अधिकारी चंद्रकान्त गळवी, तलाठी,सरकल,गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी माजी सैनिक विद्यार्थी अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स उपस्थित होते.
0 Comments