गारगोटीतील देसाई मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना मंजूर.गरिबांवर होणार आता मोफत उपचार.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
------------------------------------
गारगोटी येथील देसाई मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय योजनेतून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं मोफत केल्या जाणार आहेत. या सुविधेचा लाभ तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन हाॅस्पिटलचे प्रमुख रणजीत देसाई यांनी केले आहे.
भुदरगड-राधानगरी-आजरा तालुक्यातील गोरगरीब रूग्णांना चांगल्या दर्जाची मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलची आरोग्यसेवा गारगोटीत मिळावी अशी मागणी होत होती. या मागणीमुळे गारगोटीतील मुख्य रस्त्यावरील कॉम्प्लेक्समध्ये देसाई हाॅस्पीटलची प्रशस्त उभारणी करण्यात आली. या ठिकाणी डायलेसीस, अतिदक्षता विभाग, २४ तास एम. डी. मेडीसीन डॉक्टर उपलब्ध करण्यात आलं आहेत. आतापर्यंत हजारो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. इथं दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्ण आणि नातेवाईक यांच्याकडून येथे शासकीय आरोग्य योजना सुरु करावी अशी मागणी होत होती.
याकामी राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. आमदार आबिटकर यांच्या सहकार्य व त्यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्यामुळे या हाॅस्पीटलमध्ये महात्मा जन आरोग्य योजना शासनाने मंजूर करून दिली आहे. यामुळे भुदरगड-राधानगरी-आजरा तालुक्यातील रूग्णांची सोय उपलब्ध झाली आहे. रूग्णांना या योजने अंतर्गत मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती रणजीत देसाई यांनी दिली. यावेळी डाॅ. भूपाल पुजारी, योगीराज साखरे, सागर देसाई, दशरथ पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments