Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिद्दीने महाडिकवाडी येथील ऐश्वर्या बनली कोल्हापूर पोलिस.

 जिद्दीने महाडिकवाडी येथील ऐश्वर्या बनली कोल्हापूर पोलिस.

----------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

----------------------------------

महाडिकवाडी (ता.पन्हाळा )ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन चिकाटी असेल, तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीचं रोको शकत नाही. असचं काहीसं महाडीकवाडीच्या ऐश्वर्या दिलीप जांबीलकर ने करून दाखवल आहे. ऐश्वर्या ही एक शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. ऐश्वर्याच्या वडील दिलीप जांबिलकर हे शेती करतात त्यांनी गरीब परीस्थितीत त्यांच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. ऐश्वर्याचा भावाने   B. Com ची डिग्री घेतली असून तो ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. 

    ऐश्वर्याने पदवीधर होतानाच मनी खुणगाठ बांधुन पोलीस बनण्याचा अभ्यास सुरू केला,आणि घवघवीत यश संपादन करून, कोल्हापूर पोलीस पदी वयाच्या 24 व्या वर्षीच गवसणी घातली आहे. महाडीकवाडीच्या ऐश्वर्या जांबीलकर या शेतकरी युवतीने परिस्थिती वर मात करून, पोलीस होण्याचा बहुमान मिळविला आहे. 

   ऐश्वर्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. मुळातच अंगी हुशारी, क्रिडा स्पर्धात अग्रेसर राहुन स्पर्धा परिक्षेची आवड असलेल्या ऐश्वर्याने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महाडीकवाडीच्या विद्यामंदिर शाळेत घेतले. त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कसबा ठाणे येथे पूर्ण केले. एस एम लोहिया ज्यू. कॉलेजमधून सायन्स विभागातून अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून आर्ट्स मधून डिग्री घेतली. त्यानंतर दोन वर्ष डीडी आसगावकर ट्रस्ट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोपार्डे इथून अभ्यासाला सुरुवात केली. नंतर कोल्हापूर मध्ये येऊन सेल्फ स्टडी करून विशाल जाधव यांच्या विंग्स कबड्डी अकॅडमीमधून प्रॅक्टीस करुन शेवटी यश संपादन केले.

    जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परिस्थिती वर मात करून ऐश्वर्याने यश मिळवले.ऐश्वर्याच्या यशात तिचे आई वडील आणि  नातेवाईक यांचा मोलाचा वाटा आहे.

Post a Comment

0 Comments