मिळकत धारक, भाडेकरू, सह सरसकट पुरग्रस्थांचे पंचनामे करा - करवीर तालुका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
कोल्हापूर जिल्हयात प्रचंड पावसामुळे मोठया प्रमाणात पुर आलेल्या अनेक गांवाना पुराच्या पाण्याने वेढले होते. करवीर पुर्व भागातील काही गावामध्ये पुराचे पाणी आल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने पंचनामे करायला चालू आहेत. पण शासनाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे खरे पूरग्रस्थ मदती पासुन वंचीत राहणार आहेत, शासन पंचनामा करत असताना त्या जागेचा असेसमेंट कोणाचा आहे. त्याच्या नावावर पंचनामा करत आहेत. पण खरे पूरग्रस्त हे भाडेकरू आहेत. तसेच एका ७ /१२वर कुटुंबातील अनेकांची नावे असल्याने त्यातील कुटूंबातील एकाच सदस्याला मदत मिळणार असल्याने त्या ७ /१२ वरील अनेकजण मदतीपासून वंचीत राहणार आहेत.*
*तसेच व्यवसाईक पंचनामे करत असताना मुळ भाडेकरू हा पुरग्रस्त असताना दुकान मालकांच्या नावाने पंचनामे चालू आहेत. त्यामुळे खरे पुरग्रस्त हे मदतीपासून वंचीत राहणार आहेत व तावडे हॉटेल परिसरातील ४० ते ५० झोपडपट्टया त्याच्या पुर्ण झोपडया पाण्यात बुडाल्या असून ही त्याच्या नावावर कोणताही उतारा निघत नसल्याने त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी ते मदतीपासून वंचीत राहणार नाहीत ह्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, तसेच घरामध्ये दुकानामध्ये पाणी आल्यानंतर त्याच्या साफसफाई व औषध फवारणी सह मोठा खर्च असल्याने शासन देत असलेली मदत ही कमी असल्याने त्याच्या मध्ये ही वाढ करावी तसेच शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत करावी ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.*
*या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. भालचंद्र यादव, नायब तहसीलदारसो, करवीर यांना देण्यात आले.*
*यावेळी नायब तहसीलदार यांनी सांगितले की, शेतीचे पंचनामे चालू आहेत तसेच आपण केलेल्या मागण्या या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवून त्यावर तात्काळ कार्यवाही चालू करू व मदतीपासून कोणताही पूरग्रस्त वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.*
*यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, भरत आमते, जितू कुबडे, दीपक रेडेकर, सुनील चौगुले, योगेश लोहार, शरद माळी, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटानी, दीपक फ्रेमवाला, अजित चव्हाण, संदीप शेटके, धनंजय पाटील, रामराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.*
0 Comments