Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील असंख्य रुग्णांचा सद्भावना कृतज्ञता मेळावा.

 शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील असंख्य रुग्णांचा सद्भावना कृतज्ञता मेळावा. 

--------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

--------------------------------------

बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील असंख्य रुग्णांचा सद्भावना कृतज्ञता मेळावा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या मेळाव्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांचा ऑपरेशन झालेली सर्व रूग्णांच्या वतीने सत्कार करण्यात आला...* 🔰


*शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील अनेक व्याधिग्रस्त असणारे असंख्य रुग्ण आर्थिक अडचणीमुळे जगण्याची आशा सोडून बसले होते.परंतु आळवे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय बंगे यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंटांना घेऊन जाऊन मोफत ऑपरेशन करून असंख्य रुग्णांना जिवदान देण्याचा प्रयत्न केला.श्री.संजय बंगे यांनी केलेल्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले...*


*शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील ऑपरेशन झालेली सर्व रूग्णांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांचे ॠण व्यक्त केले. उपचार झालेल्या रूग्णांचा सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय बंगे यांनी मेळावा आयोजित करून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. तसेच गोरगरिबांची ही सेवा अखंडितपणे चालूच राहील तसेच शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील जनतेचा सेवेकरी असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले...*


*यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड (सरकार),कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),युवा उद्योजक दिपक दादा पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील (आण्णा) यांच्यासह जनसुराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील असंख्य रुग्ण उपस्थित होते...*

Post a Comment

0 Comments