अमरावती महानगरपालिका साफसफाई वर महिन्याला तीन कोटी खर्च; मग या घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण?

 अमरावती महानगरपालिका साफसफाई वर महिन्याला तीन कोटी खर्च; मग या घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण?

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन देशमुख.

------------------------------------

अमरावती.

सुमारे दहा लाख अमरावती करांचे प्रतिनिधित्व करणारी महापालिका शहर स्वच्छतेवर महिन्याकाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करते. शहरातून दैनंदिन निघणारा कचरा व हॉटेल वेस्ट देखील सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकने बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिका अर्थाने व सुमारे ६५०च्या आसपास सफाई कामगार सह कंत्राट दराचे देखील कामगार आहेत. तरी देखील शहरातील अनेक रस्ते गार्बेज कलेक्शन सेंटर बंद आहेत. दैनंदिन कचरा संकल्प व स्वच्छतेसाठी वार्ड निहाय पाच कॉन्ट्रॅक्टदार नेमले गेले आहेत. त्यांच्या वतीने शहरात घंटागाडी द्वारे कचरा संकलन केले जाते. झोन निहाय कंत्राटदारावर या काठी एकूण दोन ते २.२५ कोटी रुपये खर्च केला जातात. सुकळी व अकोली रोड येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यावर देखील खर्च होतो. कचरा वाहतूक शहरातून दैनंदिन संकलित होणारा कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत नेला जातो. सफाईवर महानगरपालिकेचा त्याचा तीन कोटी खर्च होतो. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहर स्वच्छतेवर दर महिन्याला सुमारे तीन ते सव्वा तीन कोटी रुपये खर्च होतो. घरी रस्त्यावरील घाण येत आहे. 

शहरांमध्ये अनेक रस्त्यावर, रस्त्याशेजारी कचऱ्याचे ढीग आढळून येत आहे. 

वार्ड अंतर्गत रस्त्याची देखील तीच परिस्थिती  आहे. खुल्या प्लॉटमध्ये देखील कचरा टाकला जातो. पाचवी प्रभागात झोननीय कंत्राट दाराच्या माध्यमातून मोहीम सुरू. पाचही झोन न्याय कंत्राटदारांच्या माध्यमातून शहराची स्वच्छता केली जाते. घंटागाडी द्वारे दैनंदिन कचरा संकलन करणे बंधनकारक असताना कचरा उठाव केला जात नाही. गेल्या आठवड्यापासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यात लोक सहभाग देखील महत्त्वाचा आहे असे डॉ. अजय जाधव स्वच्छता विभाग प्रमुख यांनी म्हटले आहे. कचरा दररोज उचलला जातो का? घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो तो ट्रक व कंटेनरच्या माध्यमातून सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकला जातो. मात्र शहरातील काही भागात घंटागाड्या दररोज येत नसल्याची ओरड आहे. एक दिवस आड दोन दिवस तीन दिवसांनी घंटा गाड्या येत असल्याचे चित्र आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.