Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यामंदिर करंजफेण शाळेत आगळ्या वेगळ्या दहीहंडीचा जल्लोष!

 विद्यामंदिर करंजफेण शाळेत आगळ्या वेगळ्या दहीहंडीचा जल्लोष!

--------------------------------------

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

--------------------------------------

राधाकृष्णाच्या वेशातील चिमुकले... विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी... विविध गाण्यांचा गजर, दहीहंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष... अशा उत्साही वातावरणात करंजफेण ता राधानगरी येथील विद्यामंदिरात बालचमुंनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि कृष्ण पूजनाने केली.विद्यार्थ्यांनी कृष्णभजन व पाळणागीत सादर केले.बालचमूंनी राधाकृष्णांची आकर्षक वेशभूषा केली होती या कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.राधाकृष्णांच्या  वेशभूषेत आलेल्या निरागस मुलांच्या हातातील स्त्रीभ्रूणहत्या थांबली पाहिजे.लैगिक अत्याचार थांबले पाहिजेत असे घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.अबला नारी, महिला, निरागस मुलींवर होणारे अमानुष अत्याचार थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असे आवाहन करीत बालचमूंनी दहीहंडी फोडली गोविंदा रे गोपाला... अशा वेगवेगळ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.

  हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ, पालकांनी हजेरी लावली होती.आपल्या बालगोपालांच्या बाललिला पाहून थक्क झाले.शाळेच्या प्रांगणात जणू गोकुळ अवतारले असे वाटत होते या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका विश्वांती मुंडे, सहायक शिक्षक बालाजी राख, बाजीराव जोशी, सहायक शिक्षिका माधुरी बिरबोळे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी पालकांचे सहकार्य लाभले शाळेत सामाजिक, धार्मिक विविध उपक्रम घेतले जातात.या कार्यक्रमाचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शहाजी ढेरे व सदस्यांनी, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले

Post a Comment

0 Comments