स्वामी विवेकानंद विद्यालयात शालेय निवडणूक.
-------------------------------------------
रिसोड/तालुका प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------------------------
...........-तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड येथे वर्ग दहावीच्या र्विद्यार्थ्यांसाठी शालेय निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी वयाची अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. परंतु माध्यमिक स्तरावर पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील वर्ग 9 ते 11 च्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातून मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाते. परंतु प्रत्यक्ष ही प्रक्रिया कशी राबविली जाते यांचे प्रात्यक्षिक देण्यासाठी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून मुख्याध्यापक एस डी जाधव, मतदान केंद्राध्यक्ष रवि अंभोरे, मतदान अधिकारी-1 प्रा. अमोल देशमुख,मतदान अधिकारी-2 प्रा. प्रवीण सरनाईक, मतदान अधिकारी-3 प्रा.उमेश पडघान यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
कर्णधार पदासाठी उमेदवार म्हणून कु. पूजा केशव सपकाळ व कु तनुजा प्रकाश ढोरे यांनी निवडणूक लढविली. एकूण 33 विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावला.झालेल्या मतदानाची मोजणी मतदान मोजणी अधिकारी जेष्ठ शिक्षक जगन्नाथ भिसडे यांनी मतमोजणी करुन निकाल जाहीर केला त्यामध्ये 33 पैकी कु पूजा सपकाळ हिला 22 मते, कु. तनुजा ढोरे ला 9 मते मिळाली तर 2 मते चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे बाद करण्यात आले.
विजयी उमेदवार कु.पूजा सपकाळ हिचे विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
0 Comments