ग्रामस्वच्छता , शिष्यवृत्तीसह क्रीडा क्षेत्रातही केली "राधानगरी "ची झाली जगात ओळख ! स्वप्निल कुसाळेमुळे राधानगरीचा झेंडा सातासमुद्रपार !

 ग्रामस्वच्छता , शिष्यवृत्तीसह क्रीडा क्षेत्रातही केली "राधानगरी "ची झाली जगात ओळख ! स्वप्निल कुसाळेमुळे राधानगरीचा झेंडा सातासमुद्रपार !

------------------------------------ 

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

----------------------------------- 

                गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात राधानगरी तालुक्याने ग्रामस्वच्छता व शिष्यवृत्ती मध्ये सातत्य ठेवून आपले नाव अखंडितपणे संपूर्ण राज्यभर पोहोचवले असतानाच याच तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी क्रीडा क्षेत्रातही देशाला एक पदक मिळवून देऊन राधानगरी तालुक्याचा झेंडा क्रीडा क्षेत्रातही जगाच्या नकाशावर फडकविला आहे .परिणामी अतिदुर्गम डोंगरी व ओसाड समजल्या जाणाऱ्या राधानगरीला स्वप्निलच्या या जागतिक दर्जेचे यशामुळे नवी ओळख निर्माण झाली आहे.

               केवळ धरणांचा तालुका एवढ्या पुरतीच मर्यादित ओळख असलेल्या या तालुक्यातील प्रसार माध्यमांच्या प्रभावामुळे लक्ष्मी तलावाचे सात स्वयंचलित दरवाज्यासाठी ओळखला जाऊ लागला राजर्षी शाहूंच्या कर्मभूमीत हा तालुका अनेक धबधबे इंदरगंज पठार, दाजीपूर गवा अभयारण्य यामुळे पर्यटनाची पंढरी म्हणून नवी ओळख संपूर्ण राज्यभर होऊ लागली. दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण स्तरावर गुरुजींच्या अथक मेहनत व मार्गदर्शनामुळे हा तालुका शिष्यवृत्तीतही राज्यात भारी ठरला त्यामुळेच आम्ही  "जगात लय भारी- आम्ही कोल्हापूरी" या ब्रीद वाक्याची निर्मिती झाली आणि संपूर्ण राज्यभर शिष्यवृत्ती चा राधानगरी पॅटर्न अशी नवी ओळख निर्माण झाली.                              पूर्वीपासूनच कला क्रीडा सांस्कृतिक अध्यात्मक अशा विविध क्षेत्रात तालुक्यातील अनेक नावे त्याचबरोबर गावे चर्चेत आहेत पैकी काळमावाडीतील हनुमान नाट्य संस्था, कसबा तारळे येथील दिवंगत नाट्य कलाकार नटश्रेष्ठ निळकंठ शिरगावकर, अर्जुनवाड्याचे हिंदकेसरी पैलवान दादू चौगले ,राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे कसबा तारळेचे आर बी पाटील, कुडुत्री येथील नामवंत अध्यात्मिक गुरु वामनराव गुळवणी महाराज ,गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष भिकाजीराव पाटील गुडाळकर अशा अनेक दिग्गजनी राधानगरीचे नाव राज्य व देश पातळीवर नेले तर कबड्डीच्या माध्यमातून कसबा तारळेच्या मुलींच्या संघाने राज्यात दबदबा निर्माण केला त्याचबरोबर  कौलव ,आणाजे गावातील अनेक विद्यार्थी प्रो कबड्डी मध्ये राज्यस्तरीय  चमकले आहेत.

         परंतु जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत राधानगरीची नवी ओळख कांबळवाडी (ता राधानगरी) या गावचे सुपुत्र स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी करून दिली .कारण नुकत्याच पॅरिस येथे झालेल्या ५० मीटर थ्री पोझिशियन क्रीडा प्रकारात स्वप्निल ने भारताला कांस्यपदक मिळवून दिले व ७२वर्षे ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या स्थानी असलेल्या भारताला अग्रस्थानी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे भारताचा झेंडा जागतिक स्तरापर्यंत पोहोचला हे मात्र अधोरेखित झाले. त्यामुळे प्रत्येक गावागावात आपापल्या आवडत्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वप्निल घडावेत हीच माफक अपेक्षा !


👍फोटो 👍 आपले भाऊ स्वप्निल सुरेश कुसाळे यांनी भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरल्यामुळे कांबळवाडी (ता राधानगरी )येथे जागतिक नेमबाजपट्टू स्वप्निल कुसाळे यांच्या बहिणाबाई सौ. समृद्धी ओंकार खाडे व दाजी ओंकार रघुनाथ खाडे यांनी स्वप्निलला त्यांंच्याच प्रतिमेची भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.