Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे सिकलसेल आजार निर्मूलन अभियान अंतर्गत जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले - डॉ रामहरी बेले ,तालुका आरोग्य अधिकारी रिसोड.

 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे  सिकलसेल आजार निर्मूलन अभियान अंतर्गत जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले    - डॉ रामहरी बेले ,तालुका आरोग्य अधिकारी रिसोड.


------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित सिंह ठाकुर

------------------------------- 

 - सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून पुढील पिढीला वाचविण्यासाठी व सतर्क करण्याकरिता सिकलसेलची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच विवाह करण्यापूर्वी सिकलसेल तपासणी करून घ्यायलाच पाहिजेत एखादी नवरी किंवा नवरदेव पीडित किंवा वाहक असेल तर त्यावर काही उपाययोजना भविष्यामध्ये करता येईल  त्यांना उपचाराखाली आणता येईल 

तपासणी केल्यामुळे त्या कुटुंबाचा मानसिक त्रास कमी होईल व पुढच्या पिढीला त्याचा फायदाच होईल असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ रामहरी बेले सर यांनी शिबिरादरम्यान आपले मत व्यक्त केले 

तालुक्यामध्ये मां.जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब डॉ.श्री पांडुरंगजी ठोंबरे सर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री विजय दामोदर काळे सर,जिल्हा सिकलसेल समन्वयक श्री.इंगोले सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार

 आज दिनांक 30.07.2024 रोजी श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे सिकलसेल आजार निर्मूलन अभियान अंतर्गत जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना खालील माहिती देण्यात आली सिकलसेल आजाराची लक्षणे,प्रकार ,सिकलसेल आजारावर करण्यात येणारे उपचार तसेच आजाराबाबत घ्यावयाची काळजी ,आजाराची गंभीरता व औषधोपचार या बाबत तालुका आरोग्य निरीक्षक श्री. सहदेव चंद्रशेखर तसेच तालुका सिकलसेल सहाय्यक,श्री.भारत पारवे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती दिली 

 हा आजार आनुवंशिक असून येणाऱ्या पिढीला या आजारा पासून संरक्षण व्हावे यासाठी   १ ते ४0 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांनी आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी 

यावेळी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड चे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग सोबतच 

आपला दवाखाना रिसोड शहर व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र रिसोड शहर  येथील आरोग्य सेविका कु. राठोड ,कू. जाधव आरोग्य सेवक सुमेध भगत ,श्री. निलेश साबळे  उपस्थित होते 

यावेळी श्री शिवाजी  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील  200 विद्यार्थ्यांची सिकलसेल सोल्यूबिलिटी तपासणी करण्यात आली. मुख्याध्यापक मां.श्री.देशमुख सर तसेच शाळेचे शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments