जगाला शिक्षणाचा संदेश देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जन्मभूमीत शैक्षणिक इमारतीची नागरिकांनी केली दुरावस्था,कुंभोजवासियांनो ... हे कुठं तरी थांबलं पाहिजे!
जगाला शिक्षणाचा संदेश देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जन्मभूमीत शैक्षणिक इमारतीची नागरिकांनी केली दुरावस्था,कुंभोजवासियांनो ... हे कुठं तरी थांबलं पाहिजे!
-----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे)
-----------------------------------
डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी असणाऱ्या कुंभोज गावामध्ये शैक्षणिक इमारतीची सध्या काही नागरिकांनी दुरावस्था केली असून ,संपूर्ण जगाला शिक्षणाचा संदेश देणाऱ्या डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मभूमीतच शैक्षणिक इमारतीची ही दुरावस्था झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिणामी याला जबाबदार असणाऱ्या काही ग्रामस्थांना शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांनी धडा शिकवणे गरजेचे असून, सध्या प्राथमिक शाळेचे इमारत ग्राउंड वरांडा म्हणजे काही नागरिकांचे चैनीचे ठिकाण झाले असून ,सदर ठिकाणी नागरिक करत असलेले गल्लीच काम ,घाण यामुळे सध्या विद्यार्थी व पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परिणामी शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या शाळेमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणे कुंभोज नागरिकांच्या दृष्टीने अपमानास्पद असून यावर कुठेतरी आळा घालणे गरजेचे आहे.सदर शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे कुंभोज गावचे भवितव्य असून ते यातून काय आदर्श घेणार याची चर्चा सध्या कुंभोज परिसरात रंगत आहे . केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभोज या शाळेच्या व्हारांड्यामध्ये काही लोक बसून मावा ,पान ,तंबाखू, गुटखा खाऊन तिथेच पिचकारी मारून व्हारांड्यातील फरशी अशाप्रकारे घाण करीत आहेत .या व्हारांड्यात मुले खेळतात, प्रार्थनेला बसतात ,जेवायला बसतात .याचा विचार या लोकांनी अजिबात केलेला दिसत नाही .अशा प्रकारची घाण आपण आपल्या घरात करू का ?
शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि या मंदिराचे पावित्र्य तुम्ही आम्ही सर्वांनी जपायला हवं .शासकीय मालमत्तेचा वापर अशा प्रकारे करणे योग्य नाही. अशा विकृत प्रकारावर आम्ही नजर ठेवने गरजेचे आहे .सदरची बाब निदर्शनास आल्यास त्या नागरिकावर योग्य ती कारवाई केली जाईल याची कृपया दक्षता घ्या .व हे ज्ञानाचे मंदिर स्वच्छ व सुंदर ठेवा अशि विनंती शिक्षण प्रेमीचातुन व्यक्त होत
Comments
Post a Comment