Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

केंद्र शासनाने साखरेची एमएसपी वाढवावी: चंद्रदीप नरके.

 केंद्र शासनाने साखरेची एमएसपी वाढवावी: चंद्रदीप नरके.

--------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी

आशीष पाटील  

--------------------------------


कुडित्रे,(ता. करवीर ) 


केंद्र शासनाने साखरेची एमएसपी वाढवावी, साखर निर्यात बंदी, साखर कोट्यावर निर्बंध, आणि इथेनॉल निर्मितीवर मर्यादा घातल्यामुळे साखर उद्योगाची कोंडी झाली आहे. एम एस पी मध्ये वाढ केल्यास साखर उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यास मदत होईल,अशी मागणी कुंभी कारखाना अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.





कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२४/२५ साठी मिल रोलर पूजन झाले .यावेळी ते बोलत होते,नरके यांच्या हस्ते मिल रोलर पूजन झाले. यावेळी ते म्हणाले, साखरेचे एमएसपी ३१०० रुपये असून यामध्ये वाढ करावी, असा साखर उद्योगातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.कुंभी कारखान्याने 

गत हंगामात सहा लाख ९७ हजार ६८२ टन ऊस गाळप करून,८ लाख ९६ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. १२.८३ टक्के साखर उतारा राहिला होता. या हंगामातील संपूर्ण एफ आर पी २२३ कोटी,२५ लाख ८५ हजार रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत.



 पुढील हंगामाकरिता दहा हजार, १९९ हेक्टर उसाचे क्षेत्र नोंद झाले असून यामध्ये लागण ५ हजार ५३६,तर खोडवा पीक ४६६३ हेक्टर नोंद झाले आहे. हंगाम २०२४/२५ करिता कारखान्यास पिकविलेल्या संपूर्ण उस गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.




यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे, सर्व संचालक ,कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील, खाते प्रमुख, शेतकरी ,कर्मचारी उपस्थित होते. 




ओळी 

कुडित्रे कुंभी कारखाना हंगाम २०२४/२५ करिता मिल रोलर पूजन प्रसंगी चंद्रदीप नरके ,राहुल खाडे सर्व संचालक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments