चंदनशेष महाराज कि जय.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------------
*ॲड.नकुल दादा देशमुख यांची गोवर्धन ते चंदनशेष महाराज मंदिर दर्शन व पायी वारी.
*आज प्रतिवर्षीप्रमाणे नागपंचमी निमित्त ॲड.नकुलदादा देशमुख* *मित्रपरिवारासमवेत गोवर्धन ते चंदनशेष महाराज मंदिर* *इथपर्यंत पायी वारी करत चंदनशेष महाराज नागदेवतेचे मनोभावे दर्शन घेतले.*
*या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रावजी बापू वाघ हे नागपंचमीच्या दिवशी शेतात जमिनीची मशागत करीत असताना त्यांना निगरुडीच्या झाडाखाली साप चावला होता. परंतु त्यांचे विष उतरुन ते जिवंत राहिले. जवळपास पंधरा दिवसानंतर नागदेवता त्यांच्या स्वप्नामध्ये आली. त्यांनी रावजी बापू वाघ यांना नागदेवतेचे मंदिर स्थापन कर, असा उपदेश दिला. यापुढे त्यांनी तेथे नागदेवता स्थापन करून चंदनशेष महाराज या नागदेवतेची मनोभावे सेवा केली. विशेष म्हणजे शेकडो वर्षांपासून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.त्यावेळी ॲड.नकुलदादा देशमुख व भारतीय जनता पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व स्नेही मंडळीं उपस्थित होती.*
0 Comments