शियेमधील रामनगर येथे मामाने लैंगिक अत्याचार करून केला भाचीचा खून.

 शियेमधील रामनगर येथे मामाने  लैंगिक अत्याचार करून  केला भाचीचा खून.

--------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

--------------------------------

कोल्हापूर :- महाराष्ट्राच्या विविध भागातून गेले काही दिवस महिलांच्या वरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत नुकताच बदलापुरात दोन लहान मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याची घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे त्यातच आज कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  रामनगर परिसरात दहा वर्षाच्या मुलीवर लैगीक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा संशय आहे अल्पवयीन मुलीची खून केल्याची घटना आज शिये येथील रामनगर  परिसरात घडली आहे पीडित मुलीचे आई वडील बिहार मधील असून कामानिमित्त कुटुंबासह एमआयडीसी शिरोली येथे वास्तव्यास आहेत मुलीचे आई-वडील एमआयडीसी मध्ये एका कारखान्यात कामाला आहेत 

पीडित मुलगी कालपासून बेपत्ता होती याची तक्रार पीडित मुलाच्या मुलीच्या आई-वडिलांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी  व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर शोध घेऊन अल्पवयीन मुलगी सापडली नाही सदर घडलेली घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सि सि टिव्ही फूटेज चा आधार घेऊन विहीर व ओढ्याच्या आसपासचा परिसर पिंजून काढला परंतू पीडित मुलीचा शोध लागला नाही म्हणून डॉग  स्कॉटला पाचारण करण्यात आले

डॉग स्कॉटने शिये येथील शेतातून पिडीत मुलीचा मृतदेह शोधून काढला व वैद्यकीय तपासणीसाठी सिपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला.


स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासांतच आरोपीला केले जेरबंद.

-----------------------------------

स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी जलदगतीने तपास करत चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यापैकी मामाने च अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करून खुन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे .


घटनास्थळी भेट देणारे आधीकारी.

----------------------------------------

या पिडीत मुलीच्या खुनाची  बातमी समजताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित.डी वाय एस पी निकेश खाटमोडे, स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट दिली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.