पोलीस पाटलाकडूनच अल्पवयीन मुलीची छेड छाड. वळीवडे येथील प्रकार.
-------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
ऐकाव ते नवलच चक्क गावच्या पोलीस पाटलानेच अल्पवयीन मुलीला अडवून छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार वळिवडे येथे घडला.याप्रकरणी दीपक पासान्ना या संशयित पोलीस पाटलाविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे .
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि,फिर्यादी मुलगी १४ एप्रिल २०२४ रोजी वळिवडे येथील शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेली होती.यावेळी संशयिताने शिक्षक , मुले आणि ग्रामस्थांसमोर तिला हातवारे करून बोलावले व मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. या घटनेनंतर पुन्हा एकदा गेल्या आठवडयात त्याने " तुला उसात घेऊन जातो म्हणत अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ केली. त्यांनतर पुन्हा शनिवारी दीपक याने पीडित मुलीस पाहून फोनवर बोलण्याचं नाटक करत तो म्हणाला एक मुलगी बघत आहे तिला संपवायचं आहे.
त्यानुसार संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात वळीवडे पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याच ताब्यात घेऊन.त्याला मा न्यायालयात हजर केल असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झुंजुर्के हे करीत आहे
0 Comments