शिवरंग डिजिटल फोटो पूर्वीचे मा.आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते उद्घाटन.
--------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------------------
चंदेरी नगरी हुपरी येथे लोकांच्या सेवेसाठी *शिवरंग कांबळे यांनी शिवरंग डिजिटल फोटो या नावाने नाविन्यपूर्ण आसा स्टुडिओ चालू केला असून याचे उद्घाटन मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ,कोल्हापूर.)* यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शुभेच्छा देताना मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर म्हणाले माझे सहकारी म्हणुन काम करणारे वंदन कांबळे यांनी बरेच वर्ष फोटोग्राफी घरातूनच केली त्यांच्या मनात एक खंत होती की माझा स्वतःचा स्टुडिओ गावात असावा बरेच वर्ष स्वप्न असलेली ती इच्छा आज त्यांच्या मुलाने शिवरंग कांबळे यांनी हुपरी येथे स्वतःचा स्टुडिओ टाकून वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवून त्यांना त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद दिला आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून लोकांना नावीन्य पूर्ण असे फोटो मिळणार आहेत. या फोटोच्या माध्यमातून लोकांचा आनंद द्विगुणीत करून त्यांना त्यांच्या जीवनात आनंद देऊन आपला ही व्यवसाय वाढवावा आशा शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले, आर.पी.आय राज्य सचिव मंगलराव माळगे, मा. समाज कल्याण सभापती किरण कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख अमोल देशपांडे, शहर प्रमुख विनायक विभुते,महिला आघाडी मीनाताई जाधव, मा.उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, नगरसेवक दौलत पाटील, राजू साळुंखे, गणेश वाइंगडे, रफिक मुल्ला, संभाजी हांडे, विद्याधर कांबळे, सुधाकर कांबळे, धर्मवीर कांबळे, गणेश प्रसाद भांबे, संजय लोहार, अरूण माळगे, चंदू मिस्त्री, अमजद नदाफ, अशोक कांबळे, शेख सर, दिलीप शिंगाडे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
0 Comments