कुंभोज रयत शैक्षणिक संकुल समोरील रस्त्यासाठी दहा लाख रुपयांच्या निधी देण्याची आमदार राजू बाबा आवळे यांची घोषणा, कुंभोज ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या रस्त्याच्या आंदोलनाला अखेर यश आले असून .आज हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजीव बाबा आवळे यांनी कुंभोज येथे सदर रस्त्यासाठी दहा लाख रुपये चा निधी देत असल्याचे जाहीर केले. याबाबत रयत शैक्षणिक संकुल व पालक वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले आहे .
कुंभोज तालुका हातकणंगले येथे कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे नाशिक शाखेचे मॅनेजर संजय जाधव यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजीव बाबा आवळे उपस्थित होते. यावेळी पत्रकार विनोद शिंगे यांनी रयत शिक्षण संस्थेचे आंदोलन वेगळ्या दिशेला जात असून या ठिकाणी अनेक विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोयी व अपघात होत आहेत सदर रस्त्यासाठी निधी देणे गरजेचे असून त्या निधीची घोषणा आपण करावी लागेल अशी चर्चा केली यावेळी बोलताना आमदार राजू बाबा आवळे यांनी बोलताना रयत शैक्षणिक संकुलाच्या रस्त्यासाठी आपण दहा लाख रुपये चा निधी देत असल्याची घोषणा केली.
लवकरच सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून त्याकरता आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची तात्काळ पूर्तता करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी,रवि जाधव ,जयश्री जाधव सरपंच सौ स्मिता चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव महापुरे दावीत घाटगे आप्पासाहेब पाटील तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निर्णयामुळे रयत शैक्षणिक संकुल व कुंभोज रयत शिक्षण संस्था विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
0 Comments