ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन.
-----------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
ग्रामपंचायतीच्या संबंधित सर्वच घटकांनी मिळून आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून आपल्या हक्काच्या मागण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषद संघटन ग्रामसेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संगणक परिचालक संघटना व ग्राम रोजगार सेवक संघटना या सर्वच घटकांच्या माध्यमातून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक घटकाच्या किमान न्यायिक मागण्या मान्य व्हाव्यात ग्रामपंचायतची संबंधित असलेल्या सर्व घटकांना न्याय मिळावा आपली एकजूट आणि त्या एकजुटीची ताकद कळून यावी यासाठी सर्वांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे. असे आव्हान ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शांतिनाथ धर्मगुत्ते यांनी सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केले आहे. या बेमुदत संपासाठी संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा जाहीर होत आहे ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे सर्वांनी एकत्रितपणे येऊन शंभर टक्के काम बंद आंदोलन यशस्वी होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक ग्रामरोजगार सेवक या सर्वांनी एक वजरमूठ बांधून आज पासून काम करण्याची गरज आहे इतर कोणत्याही भूलथापांना बळी न पडता हा माझा स्वतःचा लढा आहे माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मी हे बेमुदत काम बंद आंदोलन यशस्वी करणार अशा पद्धतीचा दृढ निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये करावा सर्वांनी आपल्या ग्रामपंचायतचे कामगाज शंभर टक्के बंद ठेवून सहकार्य करावे . असे आव्हान ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.
0 Comments