राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार.
----------------------------------------
कोल्हापूर :प्रतिनिधी
----------------------------------------
सांगलीला जाता जाता जयंत पाटील यांची विमानतळ परिसरामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील १० पैकी पारंपारिक ३ जागा चंदगड, राधानगरी भुदरगड, कागल ह्या राष्ट्रवादीकडे असल्याने १०० टक्के या जागा लढवणार आहे. तसेच या ३ जागबरोबरच लोकसभा निवडणुकीत झालेल्या तडजोडीमुळे पारंपारिक लोकसभेच्या दोन्ही जागा पक्षास सोडाव्या लागल्या असल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी इचलकरंजी व कोल्हापूर उत्तर ह्या दोन जागा तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या पक्षास मिळाव्यात असे प्रयत्न करावेत अशी विनंती प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी बोलताना जागावाटपाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल असे आश्वासित करून या पाचही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले त्याचबरोबर महाविकास आघाडी ही भक्कम असून कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणाने येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येण्यासाठी सर्वांनी ताकतीने कामाला लागा असे सांगितले पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून जीवाचे रान करा असे सांगितले तिकीट मागायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे परंतु पक्ष एकाच उमेदवाराला तिकीट देणार त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केले तर आभार शहराध्यक्ष आर. के.पोवार यांनी मांडले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे व रावसाहेब भिलवडे, माजी आमदार राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीदेवी माने, शहराध्यक्ष पद्मजा तिवले, युवक अध्यक्ष रोहित पाटील, इचलकरंजीचे मदन कारंडे, गडहिंग्लजचे अमरसिंह चव्हाण, शिवाजीराव खोत, शिवप्रसाद तेली, कागलचे शिवानंद माळी, बी.के चव्हाण, संतोष मेंगाने, एकनाथराव देशमुख, सुनील देसाई, गणेश जाधव, श्रीकांत पाटील, पंडित कळके, आप्पा हजारे, प्रकाश पाटील, धनाजीराव करवते, निरंजन कदम, अमोल जाधव रामराज बदाले, वसंतराव देसाई इत्यादी सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments