परराज्यात गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना बळ द्या.
परराज्यात गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना बळ द्या.
------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
संजय पवार : भगवा सप्ताहनिमित्त सभासद नोंदणीस प्रारंभ.
उचगाव :
अखंड महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र अन् परराज्यात गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचे रान करा, असे आवाहन उद्धवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी येथे केले.#
उचगाव येथे भगवा सप्ताह निमित्त कोल्हापूर दक्षिण मतदरसंघातील शिवसेना सभासद नोंदणीच्या प्रारंभ प्रसंगी संजय पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव होते. यावेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्ष संघटना बळकट करावी, असे आवाहन राजू यादव यांनी केले.#
सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, दक्षिण संपर्कप्रमुख मंगेश साळवी, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, समन्वयक विक्रम चौगुले, ग्रा.पं.सदस्य विराग करी, तालुका प्रमुख विनोद खोत, दीपक रेडेकर, राजेंद्र पाटील,सुनील चौगुले, संतोष चौगुले, दत्ता पाटील, कैलास जाधव, योगेश लोहार यांनी मनोगत व्यक्त केले.
बाळासाहेब नलवडे, शफिक देवळे, अक्षय परीट, सचिन नागटिळक, सुरज पाटील, अजित चव्हाण, अजित पाटील, इमाम पठाण, उल्फत्त मुल्ला, मोहन आवळे, अमर जाधव, अजय प्रभावळे, प्रमोद शिंदे, बाबुराव पाटील, नितीन निकम आदि उंचगाव फाटा फेरीवाले संघटना, शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.#
...फोटो ओळी.....#
उचगाव तालुका करवीर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित भगवा सप्ताहनिमित्त सभासद नोंदणी वेळी बोलताना उपनेते संजय पवार. शेजारी राजू यादव, विजय देवणे, कैलास जाधव आदी.
Comments
Post a Comment