सन्मान स्त्रीशक्तीचा..!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,वचनपूर्ती सोहळा...!
----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी /- कोल्हापूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा वचनपूर्ती मेळावा तसेच ज्या अंगणवाडी सेविका यांनी जास्तीत जास्त महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरून सहकार्य करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना तपोवन मैदान, कळंबा रोड येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्याकडून पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये करवीर तालुका मुडशिंगी बीट 2 या भागातून सांगवडे गावच्या अंगणवाडी सेविका सौ. पद्मजा शिवाजी सडोले यांना जास्तीत जास्त ऑनलाइन फॉर्म भरून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रमुख उपस्थिती उच्च व तंत्रोदय मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री मा.उदय सामंत, पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ, आमदार मा.प्रकाश आण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब, इतर मान्यवर व खूप मोठ्या प्रमाणात महिला भगिनीवर्ग उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. व कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी (C.D.P.O) मा.अश्विनी केर्ले मॅडम, पर्यवेक्षिका शिरीन सय्यद मॅडम व सहकारी सौ अरुणा माने (मदतनीस) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच ग्रामपंचायत सदस्य शितल भेंडवडे, अंकुश चांदणे, अनिकेत चांदणे, विजय कांबळे, यांनी गावातील महिलांचे फॉर्म भरते वेळेस किंवा बँकेमध्ये काही त्रुटी असतील तर त्याचे निरसन करून सहकार्य केले.
0 Comments