शिवाजीराव पाटील यांचे कार्य कौतुकास्पद - प्राचार्य जे.के.पवार.
---------------------------
कोल्हापूर :प्रतिनिधी
--------------------------
ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात नावलौकीक मिळविला असल्याचे प्रतिपादन प्राचार्य जे.के पवार यांनी केले. ते माळवाडी या संस्थेच्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे सन २०२४ - २०२५ या शैक्षणिक वर्षापासून एम.ए.भाग एक साठी समाजशास्त्र, राज्यशास्त्र भूगोल व इतिहास या विषयांना व श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालयास तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचाही सत्कार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व सी. डी.सी.सदस्य डॉ.जे. के.पवार व परिवारामार्फत करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक डॉ.बी.एन.रावण,ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार होते.
फोटो ओळ-श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये संस्था सचिव शिवाजीराव पाटील व डॉ. विजयकुमार पाटील यांचा सत्कार करताना डॉ.जे.के.पवार सोबत डॉ.बी.एन.रावण,डॉ.उषा पवार, डॉ.एस.एस.कुरलीकर,डॉ.दिग्विजय पवार व मान्यवर
0 Comments