अहमदाबाद येथे बेलआणि शमी रोपांचे वितरण व रोपणं.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
अहमदाबाद वार्ता-- संपुर्ण भारतामध्ये विविध सण- ऊत्सव तसेच धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.यावर्षी तर 1953 नंतर तब्बल 71 वर्षानंतर श्रावण महिन्यातील सुरूवात तसेचं समाप्ती सोमवारला होत आहे,हि उल्लेखनीय बाब आहे.संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये देवाधिदेव महादेवाला अर्पण करण्यात येणारी बेलाच्या पानाची लाखोळी हि धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वपुर्ण बाब आहे असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी कोर्टयार्ड स्थित राम झरूखा सेवा ट्रस्ट अहमदाबाद येथे बेल व शमी रोपांचे वितरण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता मगनभाई देसाई जेलर साबरमती जेल, चतुरभाई झाला ट्रस्ट अध्यक्ष,प्रल्हादजी ठाकोर,जोतिषभाई दवे,नरेंद्र भाई माळी,राकेशभाई गोस्वामी इत्यादी ट्रस्ट सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.ह्या प्रसंगी 51 बेल व शमी रोपांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.ह्या संदर्भात मुलंगे पुढे म्हणाले कि,अहमदाबाद शहर राजस्थान प्रांताला लागुन असल्या कारणाने येथे दरवर्षी मे व जुन महिन्यामध्ये सजीवांना होरपळून काढणारे तापमान निर्माण होते त्यामुळे कळत-नकळत मानवाची कार्यक्षमता संपुष्टात येते ह्यामध्ये तिळमात्र शंका नाही.तसेच अहोरात्र हजोरोंच्या संख्येने सुसाट धावणार्य वाहनामधुन बाहेर पडणार्या प्रदुषित हवेला शुध्द करण्याकरिता येथे वड,उंबर,पिंपळ, कडुनिंब इत्यादी देशी वृक्ष लागवडीची नितांत आवश्यकता आहे.तसेच पर्यावरण संतुलन साधण्याकरिता व शिव भक्तांना बेलाची पाने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जेथे शिवमंदिर तेथे बेल वृक्ष हि संकल्पना अमलात आणल्या गेलीचं पाहिजे हे तेवढेच खरे.सध्यस्थितीत भेसळयुक्त अन्नधान्य आणि रासायनिक पावडर युक्त फळांमुळे पाच व्यक्ति पैकी एक व्यक्ति उच्च रक्तदाब,थायरॉईड,डायबिटीज,पोटदुखी ह्या सारख्या आजाराने ग्रस्त आहेत.हप्त्यातुन तीन-चार वेळा जर बेलाच्या पानाचे सेवन केल्यास ह्यापासून कायमची सुटका होऊ शकते असा मोलाचा सल्ला उपस्थितांना ह्यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी ज्या -ज्या शिव भक्तांनी प्रसादरूपी बेल रोपाचा स्विकार केला त्यांनी त्याची लागवड करून संवर्धन करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments