Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विशाळगड दंगलीतील संभाजीराजे छत्रपती यांच्या वरील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करणार - लक्ष्मण तांदळे

 विशाळगड दंगलीतील संभाजीराजे छत्रपती यांच्या वरील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करणार - लक्ष्मण तांदळे.

------------------------------

कोल्हापूर : प्रतिनिधी

------------------------------

विशाळगडावर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी वारंवार शासनाला कळविले होते. पण शासनाच्या दुर्लक्ष पणामुळे अतिक्रमण काढण्याऐवजी टाळाटाळ केली. याचाच राग संभाजीराजे यांना असल्याने त्यांनी विशाळगडावर जाण्याचे ठरविले. याच वेळी पोलीस प्रशासन व सरकारने जर गडावर जाण्यासाठी सगळ्यांना रोखले असते तर कुणीतरी आडून केलेला हल्ला घडला नसता.कुणीतरी केलेल्या हल्याचा गुन्हा संभाजीराजे यांच्या वरती घातला आहे. तो मागे घ्यावा अन्यथा 


असे युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

संभाजीराजे विशाळगडावर जाणार हे काही समाजकंटकांनी ओळखून आगोदरच गडावर मुक्काम केला. आणि संभाजीराजे गडावर पोहोचण्या आदीच दगडफेक केली. जाळपोळ केली. आणि नाव संभाजीराजे यांच्यावर आले.याची पोलीस प्रशासनाने व सरकारने सखोल चौकशी करून खर्या गुन्हेगाराला शोधून काडणे गरजेचे असताना संभाजीराजे यांच्या वरती व कार्यकर्ते यांच्या वरती असलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. असे लक्ष्मण तांदळे युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments