Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभेवर भगवा ध्वज फडकवणेचे आव्हान -संपर्कप्रमुख प्रवीण देसाई.

 भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभेवर भगवा ध्वज फडकवणेचे आव्हान -संपर्कप्रमुख प्रवीण देसाई.

-----------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------------------

      आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा प्रमाणे आज हातकणंगले येथील मा आ. डॉक्टर सुजित मिणचेकर कार्यालयात भगवा सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हातकणंगले विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण देसाई हे होते .यावेळी बोलताना आगामी येणारी हातकणंगले विधानसभेच्या निवडणुकीत भगवा ध्वज फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागायचे असून पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशापमाणे बेएलोचे काम प्रामाणिकपणे पार पाडायचे आहे असे सूचना करण्यात आल्या.

      उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाशी ठाम असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादी तयार करून सदर पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पक्ष व आगामी विधानसभा निवडणुकीत चक्रीय होण्याचे आव्हान प्रवीण देसाई यांनी केले. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची वाढती ताकद पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवू असे आव्हान केले. यावेळी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे भगवा सप्ताहाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सांगितली. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भगवा सप्ताह साजरा केला जाणार असून त्या अनुषंगाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न शिवसैनिक नक्की साकार करतील असेही गौरव उद्गार जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी बोलताना व्यक्त केले. 

   यावेळी युवा सेनेचे प्रमुख  स्वप्निल मगदूम, शिरोली गावचे उपसरपंच बाजीराव पाटील, तसेच कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघ व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावचे शिवसेना गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत जिल्हाप्रमुख संजय चौगुले व आभार बाजीराव पाटील यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments