सोयाबीन पिकाला पाने खाणाऱ्या आळींचा आणि खोड किंडीचा प्रादुर्भाव : शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज.
सोयाबीन पिकाला पाने खाणाऱ्या आळींचा आणि खोड किंडीचा प्रादुर्भाव : शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
:- जिल्ह्याला गेल्या महिन्याभर पावसाने झोडपून काढल्याने खरीप पिके गारठून गेली आहेत. गेली पाच ते सहा दिवस झाले पाऊस थोडी उसंत घेतली आहे. आणि उघडझाप सुरू झाली आहे .असे वातावरण किडींसाठी पोषक असल्याने प्रादुर्भाव सुरू आहे .साधारण सोयाबीन ,भुईमूग, भातावर किडींचा प्रादुर्भाव अधिक जाणवत आहे. तंबाखूवर पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) चा प्रादुर्भाव जाणवत होता. आता या अळीने सोयाबीनकडे मोर्चा वळवल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत .सध्या सगळीकडे सोयाबीन वाडीच्या व फुलकळी अवस्थेत आहे. व सध्याचे वातावरण हे पाऊस व सततचे ढगाळ असल्यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीच्या प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. :- किडीवरील उपाययोजना
• पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे .
• बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक खाद्य वनस्पतींना काढून टाका .
• कीडग्रस्त झाडे पाने फांद्या यांचा नायनाट करावा.
•अळीची अंडी सुरुवातीच्या अवस्थेतील अळीग्रस्त असलेली पाने तोडून नष्ट करावीत.
• किडीचा प्रादुर्भाव समजण्यासाठी प्रत्येक किडीसाठी प्रती एकर दोन कामगंध सापळे शेतात लावावेत.
असे अहवान कृषी विभागा मार्फत करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment