Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डंपरवर मोटारसायकल आदळल्याने कौलव गावचा युवक जागीच ठार.

डंपरवर मोटारसायकल आदळल्याने कौलव गावचा युवक जागीच ठार.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------ 

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर मोटारसायकल आदळल्याने मोटारसायकल स्वार पंकज विष्णूपंत पाटील (वय २५ रा कौलव) हा युवक जागीच ठार झाला. कोल्हापूर भोगावती मार्गावरील परिते ता करवीर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.


मयत पंकज पाटील हा कोल्हापूरच्या एका औषध कंपनीत नोकरी करीत होता.काम आटोपून तो रात्री आपल्या कौलव गावाकडे मोटारसायकल वरुन येत होता.परिते गावाच्या अलीकडील पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला एक डंपर थांबला होता.त्या डंपरवर मोटारसायकल आदळल्याने पंकज पाटील जागीच ठार झाला.तो अविवाहित होता.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ असा परिवार आहे.उत्तरीय तपासणीनंतर रविवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर कौलव गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

-----------

Post a Comment

0 Comments