प्रणाली पाटील हिची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड.
------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
वाठार तर्फ वडगाव गावची कन्या प्रणाली रमेश पाटील हिची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजू बाबा आवळे यांनी भेट घेवून तिचा सत्कार केला. आपल्या भागातील मुलीने युपीएससी मध्ये मिळवले यश नक्कीच प्रेरणादायी आहे. तसेच मुलीच्या यशासाठी पाटील कुटुंबियांनी घेतलेले कष्ट हे देखील अभिमानास्पद आहे. त्यांनी अथक कष्ट करत मुलीच्या शिक्षणासाठी सर्वोपरी मदत केली. प्रणालीचे यश तिच्या आईवडिलांनी केलेल्या कष्टाची परत फेड आहे. या यशाबद्दल पाटील कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन..
भेटीवेळी ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, महेश शिर्के आण्णा शिंदे, भोसले, चेतन चव्हाण, प्रतिक शिंगे, आदी उपस्थित होते.
0 Comments