भाद्रा शिवारात शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या.
-----------------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
-----------------------------------
मागील कांहीं दिवसांपासून सतत पाऊस बरसात असल्याने शेतातील अंतर्गत मशागत कामे खोळंबली असून पिके पिवळे पडत आहेत तर शेतात प्रचंड तन वाढल्याने नापिकी झाली असल्याने कंटाळून तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. ६ रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान भाद्रा शिवारात घडली.
तालुक्यातील सायाळ-भाद्रा गट ग्रामपंचायत अंतर्गत भाद्रा शिवारात हौसाजी देविदास चींचोरे (वय ३२) यांचे जवळपास दहा एकर शेत जमीन आहे. त्यांनी शेतात काळी माती भरून शेत तयार केले होते. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून एक लाख रुपये कर्ज घेवून त्यांनी शेतात पेरणी केली. उगवलेही चांगले मात्र मागील कांहीं दिवसांपासून सतत पाऊस बरसत असल्याने पिके पिवळे पडून करपत होती. तसेच सततच्या पावसामुळे अंतर्गत शेती मशागतीची पूर्ण कामे खोळंबल्याने शेतात पिकाहून अधिक तृन वाढल्याने हातचे पीक जाणार या भीतीने हौसाजी मागील कांहीं दिवसांपासून चिंतेत होते. सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून हौसाजी चिंचोरे यांनी दि. ६ रोजी सकाळी शेताकडे जातो असे सांगून गाव शिवारातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. लोहा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लोहा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मयत चींचोरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. सदर घटने प्रकरणी लोहा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ डी. जी. किरपणे करत आहेत.
0 Comments