मविआ ने भूमिपुत्र साठी एक विधानसभा सोडावी विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना.
-------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजित सिंह ठाकुर
-------------------------------------
भूमिपुत्र शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक ....,...... काल रविवारला भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीमध्ये देशात आणि राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षेत सातत्याने होणारे गोंधळ, भ्रष्टाचार या सर्व बाबींचा विचार करून राज्यव्यापी स्पर्धा परीक्षा बचाव समितीची स्थापना भूमिपुत्र कडून करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यातील बहुप्रतिक्षित वैनगंगा- नळगंगा प्रकल्पा अंतर्गत वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी तथा सोयाबीनचे पडलेले प्रचंड भाव या दोन्ही विषयावर व्यापक आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. भूमिपुत्र च्या स्थापनेपासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत व मुबलक वीज मिळाली पाहिजेत म्हणून अनेक आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि निवेदने सरकारला दिली होती. म्हणून राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कृषी पंपासाठी वीज बिल माफी व मोफत विजेची मागणी काही प्रमाणात मान्य केली आहे. महाराष्ट्रात मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा जो महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून या दोन्ही निर्णयासाठी सरकारच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला व राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना अभिनंदनचे पत्र भूमिपुत्र कडून दिले जाणार आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेकरिता भूमिपुत्र शेतकरी संघटने कडून जोरदार तयारी करण्यात येत असून महाविकास आघाडी व काँग्रेसने गेल्या 2019 पासून भूमिपुत्राचा पाठिंबा घेऊन सर्वच निवडणुकांमध्ये आघाडी घेतली परंतु महाविकास आघाडी कडून भूमिपुत्र शेतकरी संघटनेला कायम गृहीत धरण्यात आले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वाशिम जिल्ह्यातील एक विधानसभेची जागा भूमिपुत्र ला घेण्यासाठी मागणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये रिसोड- मालेगाव विधानसभा काँग्रेसकडे असल्यामुळे महाविकास आघाडीने रिसोड- मालेगाव वगळून कारंजा- मानोरा किंवा मंगरूळ- वाशिम विधानसभेपैकी एक विधानसभा भूमिपुत्र शेतकरी संघटनेला महाविकास आघाडी कडून देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांना व जिल्ह्यातील महा विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना पत्र देऊन केली जाणार आहे. महाविकास आघाडी कडून भूमिपुत्र शेतकरी संघटनेला योग्य सन्मान न मिळाल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून येत्या विधानसभा निवडणुकीत वेगळा निर्णय घेण्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात करण्यात आली. बैठकीला वाशिम जिल्हा अध्यक्ष रामेश्वर आवचार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देव इंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी बोरकर, महिला राज्य समन्वयक डॉक्टर तृप्ती गवळी, महिला जिल्हाध्यक्षा संगीताताई मार्गे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, भूमिपुत्र चे नेते रिसोड बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे, राजू पाटील डांगे, संजय पाटील सदर, कारंजा तालुका अध्यक्ष देवेंद्र लांडकर, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, रिसोड तालुका अध्यक्ष श्रीरंग नागरे, मानोरा तालुकाध्यक्ष भूषण मुराळे, मंगरूळ तालुका अध्यक्ष विलास गहुले, मालेगाव तालुकाध्यक्ष विनोद घुगे यांच्यासह विकास झुंगरे, कपिल भालेराव, महावीर सिंह ठाकुर, विशाल मोरे, रवी जाधव, शुभम घुगे, बालाजी गोटे, गजानन सदार, गजानन जाधव, सिताराम लोखंडे, अमोल बाजड, उद्धवराव इडोळे, अंकुश काळे , गजानन काकडे, संतोष गव्हाणे,सतीश मालवे, किशोर डहाके, अंकुश काळे, राजू मानके, अभिजीत जाधव,मनोहर चव्हाण सतीश गावंडे, डॉ आशिष राठोड, धनंजय शिरसाट, वसंतराव कुटे,गजानन काकडे, संतोष गव्हाणे, धनंजय शिरसाट, वसंतराव कुटे सह जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments