Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी )शाळेत शिक्षण परिषद.

विद्या मंदिर कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी )शाळेत शिक्षण परिषद.

-------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी

आशिष पाटील

-------------------------------------

म्हासुर्ली (ता. राधानगरी )केंद्र शाळांतर्गत पहिली शिक्षण परिषद विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेत संपन्न झाली.  केंद्रप्रमुख मा. श्री कृष्णाजी लोटेकर  सर अध्यक्षस्थानी होते.  शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. ज्ञानदेव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विषय तज्ञ मा. श्री ए. वाय. पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष मा. श्री फिरोज पखाली , सर्व सदस्य तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व  शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

          प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून परिषदेची सुरूवात झाली.  मुख्याध्यापक मा. श्री डी. एम. पोवार सर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री. डी. एस. पाटील सर, श्री. सुहास पाटील सर, श्री. आनंदा पाटील सर यांनी केले.

 या शिक्षण परिषद मध्ये  आनंदायी शनिवार उपक्रम,नवोपक्रम स्पर्धा,जीवनशिक्षण अंक  या विषयावर श्री.डी.एस.पाटील सर  आणि इन्स्पायर अवॉर्ड,यशोगाथा, पायाभूत चाचणी या विषयावर श्री.सुहास पाटील सर यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. 

            यावेळी मुख्याध्यापक मा. श्री डी एम पोवार सर यांची राधानगरी तालुका शिक्षक पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी निवड झाले बद्दल विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

केंद्र प्रमुख  मा.श्री.लोटेकर सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन प्रशासकीय कामाचा आढावा घेतला.

 संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सदाशिव अस्वले सर यांनी केले.

श्री. व्ही पी पाटील यांनी आभार मानले.

       कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सौ. नंदा जाधव मॅडम, कु. पुजा पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments