टोप सिटी सर्व्हे ऑफिस मधील परिरक्षण भूमापक तुषार सोनवणे लाचलुचपत च्या जाळ्यात.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------------
टोप ता.हातकणंगले येथील सिटी सर्व्हे ऑफिस मधील परिरक्षण भूमापक तुषार महादेव सोनवणे, वय 45 ,मूळ रा.आटपाडी,जि.सांगली सध्या रा. बामनोळी,सांगली व त्याचा पंटर अमर विक्रम चौगुले वय-42,रा.हातकणंगले याला 4000 (चार हजार) रुपयाची लाच घेताना नागाव,ता.हातकणंगले येथे लाचलुचपत विभागाने सापळा रंगेहाथ पकडले.
अधिक माहिती अशी की, अंबपवाडी येथील एका इसमाकडे वारसा नोंद करण्यासाठी तुषार सोनवणे याने 8000/-(आठ हजार )रुपयांची मागणी त्याचा पंटर अमर चौगुले याच्याद्वारे केली होती. तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.या पैशाच्या मागणीची तक्रार अंबपवाडी येथील तक्रारदाराने लाचलुचपत विभाग कोल्हापूर यांचेकडे केली होती.
त्यानुसार आज दुपारी 2 च्या सुमारास नागाव येथे मोजणी चालू असलेल्या ठिकाणी तुषार सोनवणे याने तक्रारदाराला पैसे घेऊन बोलवले. त्या ठिकाणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून स्वतः परिरक्षण भूमापक तुषार सोनवणे यास चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचा साथीदार अमर चौगुले ही उपस्थित होता.
टोप येथील सिटी सर्व्हे ऑफिसचा कारभार कायमच चर्चेत राहिला आहे. वर्ष-वर्षभर या ठिकाणची कामे प्रलंबित आहेत. नागरिक हेलपाटे मारून अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. या झालेल्या कारवाईमुळे टोप परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक, अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभाग कोल्हापूर बापू साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या छाप्यातील पथकामध्ये सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, सुनिल मोरे, पोलीस हावलदार विकास माने, सुनिल वसाळकर,सुधीर पाटील हे उपस्थित होते.
0 Comments