बाहुबली मध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३६ वा समाधीदिवस समारंभ.
-----------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ मध्ये गुरुदेव समंतभद्र महाराज यांचा ३६ वा समाधी दिवस समारंभ शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. यावेळी सकाळी सात वाजता प्रतिमा मिरवणूक, चरणाभिषेक तर आठ वाजता गुरुदेवश्री समंतभद्र पूजन व समाधिशतक पठण होणार असून १० वा. विनीयांजली सभेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विनोदजी दोड्डण्णावर, सेक्रेटरी भरतेश एज्युकेशन ट्रस्ट, बेळगावी तर अध्यक्ष म्हणून बलराम महाजन सदस्य, बाहुबली ब्रह्मचर्याश्रम हे असणार आहेत तरी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाने केले आहे.
0 Comments