अवयवदान हे रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण बनू शकते- पालकमंत्री, हसन मुश्रीफ.
-----------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे राष्ट्रीय अवयवदान दिवस व जनजागृतीचे आयोजन.
कोल्हापूर, : अवयवदान हे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांनी अवयवदानाचे महत्त्व भारत सरकारच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार जुलै 2024 हा अवयवदान महिना अनुषंगाने राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला त्यावेळी बोलताना सांगितले. ते म्हणाले एक शव देणगी शेवटच्या टप्प्यातील अवयवांना नुकसान झालेल्या 8 सदस्यांना जीवनाचा आधार देऊ शकते.
राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये महिनाभरात चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, पोस्टर, कविता अशा विविध स्पर्धांचे आयोजन या महिन्यात केले होते. ३ ऑगस्ट रोजी "राष्ट्रीय अवयवदान दिन" साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयात अवयव दान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आवारा मधून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. मंत्री महोदयांनी अवयव दानाची आवश्यकता व त्याबाबतची जनजागृती या विषयावर सर्व उपस्थितांना संबोधित केले व अभियानाचा समारोप जाहीर केला.
त्यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप राऊत, वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व अध्यापक, विद्यार्थी तसेच निवासी डॉक्टर्स उपस्थित होते व त्यांनी रॅलिमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या, विद्यार्थी - विद्यार्थीनी , नर्सिंग स्टाफ, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक कार्यालय यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. रॅली नंतर मान्यवरांच्या हस्ते महिनाभरात झालेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच अवयवदानाबद्दल सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. योगेश अग्रवाल, 'द फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन व बॉडी डोनेशन' या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष व त्यांची सर्व टीम यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. तसेच योगेश अगरवाल यांनी अवयव दाना बद्दल जनजागृतीसाठी व्याख्यान दिले व उपस्थिताना त्यांच्या संघटनेच्या कार्याचा आढावा दिला.
0 Comments