Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड मध्ये पावन भूमीत विश्वविख्यात शिवमहापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचे आयोजन निमित भूमी पूजन करण्यात आले.

 नांदेड मध्ये पावन भूमीत विश्वविख्यात शिवमहापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचे आयोजन निमित भूमी पूजन करण्यात आले.

-------------------------------

लोहा प्रतिनीधी 

अंबादास पवार 

-------------------------------

विश्वप्रसिद्ध शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून भव्य दिव्य अश्या श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून कित्येक दिवसांपासून नांदेड येथील सर्व शिव भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जूना कौठा मामा चौक येथे नांदेड नगरीच्या पावन भुमित श्री शिव महापुराण कथा दि. २३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यासाठी नांदेड मध्ये होणाऱ्या भव्य दिव्य श्री शिव महापुराण कथा भव्य सभा मंडप उभारण्या करिता आयोजक यजमान डॉ.

शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांच्या शुभ हस्ते सभा मंडपाचे भुमिपूजन करण्यात आले त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व मान्यवर व श्रीराम जन्मोत्सव समिती, हिंदू धर्मातील सर्व संघटनाचे बंधू आणि सर्व भक्तगण उपस्थितीत होते. या भव्य दिव्य महापुराण कथेच्या कार्यक्रमास उत्कृष्ट असे स्थान मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हिंदू संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ता व सर्व नागरिक आपापल्या परीने सेवा देण्यासाठी तयारी करत असून नियोजनबद्ध असे कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाचा आराखडा व सर्व सुरक्षा याची खात्रीपूर्वक तयारी केली आहे. 


आयोजगाचे म्हणणे आहे की या शिवमहापुराण कथेला लाखोंच्या संख्येत सर्व शिवभक्त उपस्थित राहून या शिवमहापुराण कथेचे लाभ घेण्यासाठी येतील त्यानुसार सर्व आयोजक यांची तयारी सुद्धा चालू आहे असे आयोजकांनी माहिती दिलेली आहे. या भव्य दिव्य अशा शिवमहापुराण कथेचे लाभ घेण्यासाठी सर्व शिवभक्तांना येण्याचे आमंत्रण देखील देण्यात आले.

Post a Comment

0 Comments