मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली -आ.विनय कोरे.
------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
वारणानगर (ता.पन्हाळा) येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यात ८६ हजार २२६ लाभार्थ्यांच्या लाभ मिळवून दिल्याबद्दल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना भेटवस्तू चे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणेत येत असलेला तसेच जनसुराज्यशक्ती व सुराज्य फौंडेशनच्या माध्यमातून शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचे 'मोफत नोंदणी अभियान' राबविणेत आले होते.यामध्ये शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविला आणि कमीत कमी दिवसामध्ये ८६ हजार २२६ एवढी उच्चांकी नोंदणी पूर्ण केली.
शाहूवाडी तालुक्यात ३४ हजार ७७१ तर पन्हाळा तालुक्यात ५१ हजार ४५५ असे दोन्ही तालुक्याचे मिळून एकूण ८६ हजार २२६ एवढे उच्चांकी अर्ज ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून प्राप्त झाले. या योजनेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.
शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील ८६ हजार २२६ महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनची भेट म्हणून १९ ऑगस्ट पर्यंत जून व जूलै या महिन्याचे ३ हजार रुपयांचे अनुदान खातेवर जमा होणार असल्याची माहिती विधानसभास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी दिली.
यावेळी पन्हाळा - शाहूवाडी प्रांत आधिकारी समीर शिंगटे,पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे,पन्हाळा नायब तहसीलदार अस्लम ज मादार,शाहूवाडी गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार,बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहल माने,जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),विशांत महापूरे,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई,माजी सभापती बाबा लाड,परशुराम खुडे,शाहूवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे,पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर,वैशाली पाटील,गीतादेवी पाटील,रणजित शिंदे यांच्यासह शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments