Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा' कार्यक्रम संपन्न.

 एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा' कार्यक्रम संपन्न.

--------------------------------

कोल्हापूर, प्रतिनिधी

--------------------------------

दिव्यांगांना यु.डी.आय.डी. कार्ड, व्हिल चेअर, जयपूर फूट, एम. आर. किट, इलेक्ट्रिक किट व कानाचे मोल्ड इ. उपकरणाचे वाटप.

:  जिल्ह्यात महसूल पंधरवडा उपक्रमाअंतर्गत 'एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा' हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या कार्यशाळेतील दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे स्टॉल मांडण्यात आले होते. या स्टॉलची पाहणी करुन त्यांनी दिव्यांग बांधवांचे कौतुक केले. 


   कार्यक्रमास सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी साधना कांबळे व समन्वय अधिकारी तहसीलदार वनिता पवार आदी उपस्थित होते. 


 यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनाथ मुलांना प्रमाणपत्र वाटप, शिवाजी विद्यापीठाकडून दिव्यांग बांधवांना शिष्यवृत्तीचे वाटप, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप, तसेच दिव्यांग बांधवांना यु.डी.आय.डी. कार्ड, व्हिल चेअर, जयपूर फूट, एम. आर. किट, इलेक्ट्रिक किट व कानाचे मोल्ड इ. उपकरणाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मिळालेल्या उपकरणाबदल आभार मानले. या कार्यक्रमात दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


कार्यक्रमाची सुरुवात ज्ञान प्रबोधन भवन अंध शाळेतील विद्यार्थ्याच्या स्वागत गीताने झाली. यानंतर साधना कांबळे यांनी केलेल्या प्रास्ताविकात समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर व महसूल विभाग यांच्या मार्फत दिव्यांग बांधवासाठी राबविण्यात येणा-या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली.


 कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळा, कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाच्या शेवटी वनिता पवार यानी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments