Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळा जर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे चालू व एकशे तीन मिलिमीटर पाऊस.

 पावसाळा जर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे चालू व एकशे तीन मिलिमीटर पाऊस.

------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे

------------------------------

राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे पैकी एक दरवाजे बंद झाला असून धरण परिसरात 103 मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी दिली


राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचा तीन स्वयंचलित दरवाज्यापैकी एक स्वयंचलित दरवाजा पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी बंद झाला तर दोन दरवाजे चालू असून धरण परिसरात एकशे तीन मिलिमीटर पाऊस झाला तर धरणाची पाणी पातळी ३४६.८० फूट व पाण्याचा साठा 8227.20 दशलक्ष घनफूट रविवारी सायंकाळी चार वाजता 43 मिलिमीटर पाऊस इतका झाला असून एक जून ते चार जुलै अखेर 4259 मिलीमीटर पाऊस झाला आहे तर दोन स्वयंचलित दरवाज्यातून 2856 क्यूशेकस तर बीओटी विद्युतग्रहा तून पंधराशे क्यूसेक असा एकूण 4356 क्यूशेक भोगावती नदी च्या पात्रामध्ये विसर्ग होत असल्याने भोगावती नदीकडच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी दिला आहे

Post a Comment

0 Comments