श्रावण मासानिमित्त पायदळ दिंडी सोहळा.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
केशवनगर श्री बालाजी संस्थान ते शेगाव संत गजानन महाराज संस्थान. प्रतिनिधी रिसोड रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील श्री बालाजी संस्थान केशवनगर येथे गेल्या नऊ वर्षापासून अतिशय शिस्तबद्ध आणि धार्मिक पद्धतीचे आयोजन करून केशवनगर परिसरातून केशवनगर येथील व परिसरातील भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होत असतात ,यावेळी केशवनगर येथील श्री बालाजी संस्थान येथून सदर दिंडी सोहळा हा दिनांक 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत असा प्रवास असणार आहे ,या दिंडी सोहळ्यात ज्या ही भाविक भक्तांना दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी दिंडीमधील सर्व नियमांचे व धार्मिक पद्धतीचे पालन करावे लागेल व दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी दिंडीच्या पोशाखामध्येच सहभागी व्हायचे आहे , सदर पोशाखामध्ये पांढरी टोपी ,पांढरा शर्ट ,पांढरा पैजमा या पोशाखामधेच यावे लागेल यावेळी 21 ऑगस्ट बुधवार रोजी केशवनगर येथून श्री बालाजी संस्थान मधून सकाळी नऊ वाजता सदर दिंडी सोहळा प्रस्थान होणार आहे, या दिवशी रात्री जगदंबा माता संस्थान नागरतास येथे मुक्काम असणार तर कीर्तनाचा कार्यक्रम ह भ प विठ्ठल महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे, तसेच दिनांक 22 ऑगस्ट गुरुवार रोजी पातुर येथील सिद्धाजी महाराज संस्थान येथे मुक्काम व कीर्तन रुपीसेवा ह भ प प्रताप महाराज खोटे आळंदी यांचे कीर्तन होणार असून, दिनांक 23 ऑगस्ट रोज शुक्रवारला वाडेगाव सस्ती येथे मुक्काम होणार असून यावेळी कीर्तन रुपी सेवा ह भ प विठ्ठल महाराज जाधव यांचेकीर्तन होणार आहे दिनांक 24 ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान येथे शेवटचा मुक्काम असून या दिंडी सोहळ्यामध्ये यावेळी संध्याकाळची कीर्तन रुपी सेवा ह भ प विठ्ठल महाराज देशमुख लिंगापेन यांची होणार आहे, यावेळी सदर दिंडी सोहळ्यामुळे या भागामध्ये धार्मिक वातावरण निर्मिती होते ,या दिंडी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविक भक्तांनी व दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बी टी बिलारी दिंडी चालक यांच्यासह ह भ प विठ्ठल महाराज देशमुख ह भ प विठ्ठल महाराज जाधव व समस्त गावकऱ्यांनी केले आहे
0 Comments