विद्यामंदिर करंजफेण येथे पहिली शिक्षण परिषद संपन्न.
-----------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-------------------------------------
राधानगरी पंचायत समिती शिक्षण विभाग गुडाळ केंद्र शाळा अंतर्गत विद्यामंदिर करंजफेण येथे शिक्षण परिषद संपन्न झाली.यावेळी अध्यक्षस्थानी आवळी बु विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अशोक येरुडकर होते.
या परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.वासुदेव पाटील यांनी शाळापूर्व तयारी,मेळावे त्यासाठी करण्यात येणारे नियोजन, शिक्षण परिषदेचे महत्त्व, शैक्षणिक धोरण, नवोपक्रम कृतीयुक्त शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले.तसेच राजेंद्र रेपे यांनी शिक्षण परिषदेमधुन होणारी विचारांची देवाणघेवाण, शैक्षणिक बदलाची माहिती, मुख्यमंत्री माझी समृद्ध सुंदर शाळा याविषयी माहिती दिली, केंद्र प्रमुख संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे नवीन उपक्रम कशा पद्धतीने असावेत,त्यांची उद्दिष्टे कोणती त्यांचे मुल्यमापन कशा पद्धतीने होते याची माहिती दिली
यावेळी शिष्यवृत्ती आणि प्रज्ञाशोध परिक्षा मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापीका विश्रांती मुंडे,शिक्षक बालाजी राख यांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून चांगले काम केल्याबद्दल अध्यक्ष शहाजी ढेरे यांचा आणि गुडाळ केंद्रात नविन रूजू झालेल्या शिक्षक,शिक्षकेंचा सत्कार करण्यात आला.स्वागत आणि प्रास्ताविक बालाजी राख यांनी केले.आभार माधुरी बिरबोळे यांनी मानले . यावेळी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा शितल वागरे, सदस्य विद्या वागरे, मनिषा वागरे,गीता कांबळे, विठ्ठल आलंगदार, संजय पाटील, बंडोपंत कांबळे यांच्यासह शिक्षक- शिक्षीका उपस्थित होत्या
0 Comments