रिसोड येथील रामनगर इंदिरानगर व गौसपुरा येथील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांच्या जागा नियमाकुल करण्यात याव्यात.
रिसोड येथील रामनगर इंदिरानगर व गौसपुरा येथील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांच्या जागा नियमाकुल करण्यात याव्यात.
------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजित सिंग ठाकूर
------------------------------------
अन्यथा भारत गुंजकर यांचा उपोषणाचा इशारा रिसोड येथील सामाजिक कार्यकर्ते भारत जगन्नाथ गुंजकर (मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा संपर्कप्रमुख वाशिम ) हे नेहमीच जनसेवेत आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ,यांनी बऱ्याच दिवसापासून रिसोड येथील रामनगर इंदिरानगर गौसपुरा भागासाठी लढा उभारलेला आहे ,त्यामध्ये त्यांनी येथील पूर्ण शासकीय जमिनीची मोजणी करून त्या नियमाकुल करण्यात याव्या व सर्व नागरिकांना तिथे राहत असलेल्या सर्व गोरगरीब जनतेला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे अशी मागणी यांनी बऱ्याच दिवसापासून केलेली आहे ,त्यावर अद्यापही शासनाने कार्यवाही केली नाही ,त्यामुळे त्यांनी 13 अगस्त 2024 रोजी आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे ,त्यामध्ये त्यांनी नजुल महसूल प्रशासन व नगरपरिषद यांनी याकडे तात्काळ लक्ष घालावे जेणेकरून येथे राहणाऱ्या गरीब लोकांना शासनाच्या या प्रॉपर्टी कार्ड मुळे योजना घेता येतील आणि स्वतःचे घरकुल सुद्धा त्यांना घेता येईल सदर नागरिकांना आजपर्यंत ही जमीन मौजे रिसोड येथील सर्वे नंबर 441 मधील रामनगर इंदिरानगर व गौसपुरा भागातील जमीनीवर नागरिक 1965 पासून वास्तव्यास असून आज पर्यंत शासनाने त्यांना प्रॉपर्टी कार्ड न दिल्यामुळे त्यांना शासनाच्या सर्व योजनांपासून वंचित राहावे लागत आहे याला शासन म्हणजे शासन जबाबदार असून न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,त्यांनी 7 आगस्ट रोजी सदर निवेदन जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, पोलीस अधीक्षक वाशिम ,तहसीलदार रिसोड, गट विकास अधिकारी रिसोड ,ठाणेदार पोलीस स्टेशन रिसोड, नजुल कार्यालय रिसोड, नगरपरिषद ,यांना सदर निवेदनाच्या प्रति दिलेल्या आहेत ,यावर तात्काळ शासनाने प्रॉपर्टी कार्ड व नियमाकुल करून न दिल्यास भारत गुंजकर यांनी उपोषणाला बसणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे व तसे निवेदनही सादर केले आहे
Comments
Post a Comment