छत्रपती शिवाजी शिवाजी यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना देताना.
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर.
---------------------------------------
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषीवर योग्य ती कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने रिसोडचे निवासी नायब तहसीलदार डॉ. बाळासाहेब दराडे यांना आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 ला निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले आहे की, मालवण मधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता परंतु काही महिन्यातच तो कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकासह शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या असून संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी व तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने बसवावा अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदन देताना तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव, शहर अध्यक्ष अरुण क्षीरसागर, सचिन चोपडे, गोपाल मगरअशोक सोनुने, गणेश हमाने, अमर रासकर, विशाल कराळे, नितीन निर्बान, सतीश पवार पवन चोपडे, प्रतीक मंत्री नामदेव जाधव, धर्मेंद्र पवार प्रतीक मंत्री चेतन कुदळे सागर पवार आकाश पाटील आशिष देवकर शिवा मेहकर बाळू हमाने नामदेव अंभोरे संदीप शेळके पांडुरंग शेळके गजानन धामणी रतन पळसकर संतोष शिंदे अमित जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments