Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागनाथ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या सैरक्षक भिंत बांधकामाला नंरदे ग्रामसभेचा विरोध.

 नागनाथ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या सैरक्षक भिंत बांधकामाला नंरदे ग्रामसभेचा विरोध.

---------------------------------------

हातकलंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

---------------------------------------- 

           नरंदे तालुका हातकणंगले येथे  नागनाथ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या सैरक्षक भिंत बांधकामाला विरोध करण्यासाठी आज नरंदे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते .सदर ग्रामसभेमध्ये गट क्र.218जागेचा वाद हा न्यायप्रविष्ठ असून त्याचा निकाल 9-9 2024 रोजी लागणार आहे. परिणामी तोपर्यंत सदर जागेवरती कोणत्याही पद्धतीचे बांधकाम अथवा कंपाऊंड करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला. 


    तसेच यावेळी सदर ग्राउंड वरती गावातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम संपन्न होतात, त्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी तसेच खेळासाठी सदर जागा राखीव ठेवण्यात यावी, त्याच पद्धतीने त्या जागेवरती कोणतेही संरक्षक भिंत घालण्यात येऊ नये, सदर  जागेवरती संरक्षक भिंत घालण्यासाठी काही राजकीय मंडळी पोलीस यंत्रणेचा दबाव टाकून भिंत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी अशी कोणतीही घटना घडल्यास नरंदे गावात तीव्र आंदोलन छेडले जाईल त्याच पद्धतीने सदर शाळेमधील नरंदे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले जाणार नाही, जागेच्या निर्णयात लोकप्रतिनिधींनी सहभाग न घेतल्यास  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदाना वर बहिष्कार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, परिणामी याबाबत नरंदे ग्रामस्थ पालकमंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना भेटणार असून याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थातून होत असून, सदर जागेच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय झाल्यास गावात  आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी झालेल्या ग्रामसभेमध्ये  घेण्यात आला. 


     परिणामी यावेळी काही राजकीय व्यक्ती वैयक्तिक व्देशासाठी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वर खोटे गुन्हे दाखल करत असून याबाबत पोलिस यंत्रणेने पूर्णपणे चौकशी करून निर्णय घ्यावा, तसेच पोलीस यंत्रणेने कोणताही राजकीय दबावाला बळी न पडता काम करावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. यावेळी सदर जागेवरील बांधकामाला विरोध करण्यासंदर्भात उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी हात उंचावून सर्वानुमते ठराव पास करत असल्याचे सांगितले.


      नरंदे हायस्कूलचे सदर मैदानावर जबरदस्तीने भिंत बांधण्याचे प्रयत्न संस्थापक प्रतापराव देशमुख करत आहेत. याविरुद्ध  कंपाउंड संदर्भात धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा उभा करायचा आहे. यासाठी सर्व गावकऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी ताकतीने लढा देणे गरजेचे आहे.असे मत बाळासाहेब भंडारी यांनी बोलताना व्यक्त केले.यावेळी सरपंच पुजा कुरणे, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजु भोसले , शरद सहकारी साखर कारखान्याची संचालक अभिजीत भंडारी ,संदिप भंडारी,माजी सरपंच रवी अनुसे ,नितीन कदम ,बाळासाहेब भंडारी, महादेव माने,तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच रवींद्र अनुसे यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम यांनी मांडले

Post a Comment

0 Comments