गांधीनगर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्त सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद.
-----------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखणाऱ्या भाजपला हद्दपार करण्यासाठी उध्दवसाहेब ठाकरे यांना साथ द्या. तसेच कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेले काम व्यापाऱ्यांपर्यंत पोहचवावे असे आवाहन शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगर व्यापार पेठेत भगवा सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
भगवा सप्ताह निमित्त कोल्हापूर दक्षिण मतदरसंघातील शिवसेना पक्षाच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ गांधीनगर व्यापार पेठेत करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट होते. यावेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्ष संघटना बळकट करावी असे आवाहन पोपट दांगट यांनी केले.
यावेळी संपूर्ण व्यापार पेठेत फिरून सभासद नोंदणी करण्यात आली. व्यापाऱ्यांनी यास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, ग्राहक सेनेचे जितू कुबडे, शरद माळी, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, उपगांधीनगर प्रमुख दीपक पोपटानी, उपगांधीनगर प्रमुख दीपक धिंग, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, शिवाजी लोहार, वसंत पोवार, अजित चव्हाण, रामराव पाटील, श्रीकांत सावंत, नमेश चव्हाण आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments